मंडळी लिहिते व्हा!

BMM2026 Smaranika
नमस्कार,

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या २०२६ च्या सिॲटल अधिवेशनाची तयारी जोमाने चालू आहे आणि आम्ही तुम्हा सर्वांचं स्वागत करायला उत्सुक आहोत. ह्या अधिवेशनाच्या स्मरणिका समितीकडून तुम्हा सर्व उत्साही लेखक मंडळींना तुमची लेखणी सरसावायला साद देत आहोत. त्याला जरूर प्रतिसाद द्या! लिहिते व्हा! तुमची शब्दकळा आपल्या स्मरणिकेच्या पानांतून बहरू द्या!

खूप दिवस मनात घोळणारं काही
खोल खोल रुजलेलं काही!
पाहिलेलं, जाणवलेलं
वाचलेलं, अनुभवलेलं
हळवं, हसरं आल्हाददायी…
अक्षरातून बरसू दे!
लेखणीतून साकार होऊ दे!

मंडळी, विषयाला बंधन नाही… कथा, कविता, लेख, विनोद, पाककृती, शब्दकोडी, ललित, तात्विक, वैचारिक, चिंतनपर, मुक्त अश्या अनेक आयामातून तुमची लेखणी संचार करू देत!

आणि हो…

पाककृती पाठवत असाल तर पारंपारिक, विस्मृतीत गेलेला पदार्थ तुम्ही स्वतः तयार करून त्याचे छायाचित्र पाककृती सोबत पाठवा. आजीच्या हातचे मधुर राघवदास लाडू, आईने केलेल्या खमंग भाजणीच्या थालीपीठ, काकूने केलेली मेथीची चटकदार पचडी… दिंडी, घावन घाटलं, सांदण, गुळवणी, आंबील, पाटवड्या, पघळणी, गुळवणी, गोळ्यांची आमटी, घुटं, आंबट वरण अशा आणि कितीतरी खास मराठी जुन्या चवींना नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याची ही संधी! चला, महाराष्ट्रीय स्वादाची परंपरा स्मरणिकेत जपूया!

📅 साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२५ ३१ जानेवारी २०२६

काही प्रश्न असल्यास 📧smaranika@old.bmmseattle2026.org येथे संपर्क साधा.

धन्यवाद!

काही महत्वाचे!

मंडळी, एक जबाबदार नागरिक म्हणून आणि पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल ह्या उद्देशाने, यंदा स्मरणिकेच्या मर्यादित छापील प्रतीच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. छापील प्रतींची किंमत $५ असेल. कृपया नोंद घ्यावी कि ही रक्कम तिकिटाच्या किमतीमध्ये समाविष्ट नसून ती स्वतंत्रपणे भरावी लागेल. तुम्हाला स्मरणिकेची छापील प्रत हवी असल्यास, तिकीट काढताना किंवा नोंदणी करताना तसा पर्याय निवडावा. स्मरणिकेची डिजिटल आणि ऑडिओ आवृत्ती सर्व रसिकांसाठी मोफत उपलब्ध करून दिली जाईल.

आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार!


स्मरणिका स्पर्धा!

स्मरणिकेसाठी खालील स्पर्धा आयोजित केल्या असून ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करीत आहोत.
१) कथा स्पर्धा
२) मुखपृष्ठ चित्रकला स्पर्धा

अधिक माहितीसाठी येथे भेट द्या: स्मरणिका स्पर्धा

📢 Starting July 4th, registration with food will go up to $700 for adults and $575 for children. Register by July 3rd to take advantage of the current prices of $600 for adults and $475 for children. The price without food stays the same at $350 for adults and $225 for children.